महाराष्ट्र राज्यातील अनेक महापालिका मध्ये भाजप आणि महायुतीचा विजय.

महापालिका निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. राज्यात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळालं आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक मोठ्या महापालिकांमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. अनेक महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे, तर दुसरीकडे विरोधकांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं, त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

maymarathi24news
Author: maymarathi24news

B. A. PASS

Leave a Comment

शहर चुनें