घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा गॅस वितरकांना सूचना अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा…..

लातूर, प्रतिनिधीदि. २४ :

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. गॅस वितरणाबाबत पारदर्शकता राखावी आणि कोणत्याही परिस्थितीत अवैध विक्री होणार नाही यावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. लातूर जिल्ह्यातील गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारक आणि सेल्स ऑफिसर्सची बैठक झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें