उदगीर, दि. १८ मे २०२६ : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उदगीर व पंचायत समिती उदगीर च्या वतीने आज तालुकास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांची “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” ही तालुकास्तरीय कार्यशाळा मलशेट्टीआप्पा नागराळकर सभागृह, पंचायत समिती उदगीर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन उदगीर व जळकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा.श्री. संजय बनसोडे साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्रीमती उषाताई पाटील तळेगावकर, अध्यक्षा जिल्हा परिषद लातूर, मा. श्री ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, आरोग्य व बांधकाम सभापती जिल्हा परिषद लातूर उपस्थित होते.
कार्यक्रमास मान्यवर म्हणून पंचायत समिती उदगीर च्या सभापती मा. श्रीमती वनमालाताई तात्यारेड्डी मरलापल्ले, मा. श्री बापूसाहेब उद्धवराव भोसले, उपसभापती पंचायत समिती उदगीर, मा. श्री दिलीपकुमार मारोती मटके, जि.प. सदस्य (गटनेता) लातूर, मा. श्री रामचंद्र पंढरीनाथ तिरुके, जि.प. सदस्य (गटनेता) लातूर, मा. डॉ. दीपक संग्राम सोमवंशी, जि.प. सदस्य, मा. श्रीमती उषाताई भुजबळे, जि.प. सदस्य, मा. श्री मुकेश शिवाजी भालेराव, जि.प. सदस्य, मा. श्रीमती रुपाली प्रशांत गायकवाड, जि.प. सदस्य, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुनील भागवत, उपविभागीय अधिकारी श्री सुशांत शिंदे, तहसीलदार श्री राम बोरगावकर, गट विकास अधिकारी श्री नरेंद्र मेढेवार, मा.श्री. बालाजी भोसले पाटील राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष, मा.श्री. वसंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष, मा.श्री. श्याम डावळे जिल्हा नियोजन समिती सदस्य, तालुक्यातील सर्व पंचायत समिती सदस्य, तसेच तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ हरेश्वर सुळे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ सचिन राठोड तालुका आरोग्य अधिकारी उदगीर यांनी केले. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ संतोष हिंडोळे यांनी “माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” या योजनेबद्दल थोडक्यात माहिती दिली..
कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजनांची माहिती, आरोग्यविषयक उपक्रमांची अंमलबजावणी तसेच गाव पातळीवर आरोग्यदायी वातावरण निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री नरेंद्र मेडेवार, गट विकास अधिकारी पंचायत समिती उदगीर, डॉ. सचिन राठोड, तालुका आरोग्य अधिकारी उदगीर कार्यालयातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यशाळेस तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.