उदगीर/( रोहिदास कलवले), ऑनलाईन खरेदी पूर्वी मोठ्या शहरांमध्ये म्हणजे मुंबई ,पुणे ,नागपूर आदी शहरांमध्ये चालतअसे परंतु आता ऑनलाइन खरेदीचे लोण ग्रामीण भागात पसरले असल्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय संकटात आल्यामुळे व्यापारी वर्गाला आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा टाकला आहे;. आजचा तरुण वर्ग काहीही खरेदी करायची असेल तर ऑनलाईन खरेदी करीत असल्यामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून येत असल्याची चित्र दिसत आहे ..अनेक व्यवसायिकांनी तर आपला व्यवसाय मोडीत काढल्याचे दिसत आहे. ऑनलाइन खरेदी ही ग्रामीण भागातील व्यापाऱ्याच्या मुळावर आल्याचे दिसत असले तरी व्यापाऱ्यांना आता आपल्या उदरनिर्वासाठी काय करायचे असा प्रश्न समोर उभा आहे. ग्राहकांना दुकानातून खरेदी करायची झाले तर वस्तूवरील छापील रक्कम देऊनच खरेदी करावे लागते..मात्र ऑनलाईन खरेदीवर ग्राहकांना सूट मिळत असल्यामुळे ग्राहक ऑनलाईन खरेदी कडे जास्त पसंती दिसत आहे .तसेच ऑनलाईन खरेदी केल्यानंतर घरबसल्या खरेदी केलेला माल मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन खरेदीने पाय पसरविले आहेत. तसेच खरेदी केलेला माल पसंत नाही आल्यास परत सुधा घेतला जातो. यामुळे नागरिक ऑनलाईन खरेदीवर भर देत आहेत. बाजारपेठेतील दुकानदार दुकाने थाटून सुद्धा म्हणावे तसे ग्राहक मिळत नसल्यामुळे व्यवसाय डबघाईला आला असल्यामुळे ग्रामीण भागातील व्यापारी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसत असले तरी याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर पडत आहे .आता ग्राहक ऑनलाइन खरेदी करीत असल्यामुळे गावातील बाजार पेठेतील खरेदी कडे पाठ फिरवले आहे .आता ऑनलाईन खरेदी ग्रामीण भागातील व्यवसाय मोडीत काढणारच हे मात्र नक्की ….