महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या कार्याध्यक्षपदी शिवकुमार उप्परबावडे, मिरवणुक प्रमुख कलप्पा स्वामी व महेश तोडकर यांची निवड

उदगीर (प्रतिनिधी): जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव 2026 अध्यक्ष प्रमोद शेटकार यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्षपदी शिवकुमार उप्परबावडे, मिरवणुक प्रमुख म्हणुन कलप्पा स्वामी व महेश तोडकर यांची निवड आली.
उदगीर येथील वीरशैव समाज (संग्राम शाळा) येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर महोत्सव जयंती समितीच्या
बैठक वीरशैव समाजाचे प्र.अध्यक्ष प्रमोद शेटकार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस मान्यवरांच्या कोषाध्यक्ष सुभाष धनुरे उपस्थित होते. प्रारंभी जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बसवेश्वर जयंती उत्सव साजरा करण्यासाठी स्वतंत्र समिती निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगीतले. वीरशैव समाजाचे अध्यक्ष हेच सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे पदसिध्द अध्यक्ष असल्याने सार्वजनिक जयंतीच्या समिती अध्यक्षपदी प्रमोद शेटकार तर कार्याध्यक्षपदी युवा नेतृत्व शिवकुमार उप्परबावडे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष म्हणून न.प.चे स्वच्छता सभापती राजकुमार हुडगे, व गणेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव २०२६ मिरवणुक प्रमुख म्हणुन कलप्पा स्वामी, समता नगर, व ग्रा.प.सदस्य महेश तोडकर मलकापुर यांची निवड करण्यात आली. रक्तदान शिबीर प्रमुख अशिष अंबरखाने, ओम गांजुरे यांची निवड करण्यात आली. जयंती महोत्सव उत्साहात विविध उपक्रम राबवून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें