सुप्रसिद्ध कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे प्रवचन उदगीर येथे संपन्न….

उदगीरप्रतिनिधी : समाजसुधारकांचे व वारकऱ्यांचेच कार्य अंनिस करते……. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे दि. 12 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीर च्या वतीने सुप्रसिद्ध कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.ते संत साहित्यातील संविधानिक मूल्ये या विषयावर बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा, वाईट रुढी, बुवाबाजी, भूत, भानामती व निरर्थक कर्मकांड इत्यादीवर प्रहार केले.संत वारकरी व महामानव यांचाच वारसा अंनिस चालवते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.. मध्ययुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव महाराज, एकनाथ महाराज इत्यादी संतांचा दाखला देत त्यांनी वचन व अभंगांच्या, ओव्यांच्या माध्यमातून समाजातील अंधरूढीवर प्रकाश टाकला.त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या, भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय ही मूल्ये संत साहित्यामध्ये सुद्धा आहेतच याचा त्यांनी अनेक उदाहरणे देत आवर्जून उल्लेख केला. याच कार्यक्रमात महाराष्ट्र अनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांना बाबा आमटे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमुख वक्ते श्याम सुंदर सोन्नर महाराज यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अनिस उदगीर शाखेचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक मनोहर पटवारी हे होते. अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख वक्ते शामसुंदर सोन्नर महाराज यांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. पटवारी सर यांनी अंधश्रध्दा समाजाच्या विकासात बाधा निर्माण करते, असे नमूद केले.या कार्यक्रमात उदगीर शहरातील आश्रयदाते, जाहीरातदार, सुप्रसिद्ध डॉक्टर शरद तेलगाने व डॉक्टर अंजुम कादरी व डॉक्टर ज्योती सोमवंशी यांचा प्रमुख वक्ते श्यामसुंदर सोन्नर महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराष्ट्र अनिस उदगीरचे कार्यकर्ते श्री रघुनाथ मोरे यांनी एक अंधश्रद्धा निर्मूलनावरील बहारदार गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व अनिसचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात प्रा. मनोहर पटवारी यांनी संतांच्या विचारांचा आढावा घेत अलीकडच्या काळात धर्माचा व भक्तीचा अतिरेक होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.याच प्रसंगी पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी व रवी हसरगुंडे यांचा प्रमुख वक्ते शामसुंदर सोन्नर महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच योगाचार्य डॉक्टर संग्राम पटवारी विश्वनाथ मुडपे गुरुजी, प्राचार्य विजयकुमार पाटील प्रा.बाबुराव माशाळकर प्रा.डॉ बळीराम भुक्‍तरे, माणिक वाघमारे, गुणवंत वाडकर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उदगीर अनिसचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा. बाबूराव माशाळकर यांनी करून दिला.संचलन व आभार कै. बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालयाचे तत्त्वज्ञान विषयाचे डॉ.गणेश बेळंबे यांनी केले.संचलनातून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय उदगीरचे संचालक डॉ.दापकेकर साहेब, डॉ. भिकाणे,बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष सुधाकर दापकेकर, प्रा. सुरेश शिंदे,प्रा. दत्ताहरी होनराव, ज्योती डोळे, श्रीदेवी माशाळकर,दगडू पडिले, सौ पडिले,गोविंद सावरगावे,प्राचार्य ओमप्रकाश क्षीरसागर, प्रा. अनंत शिंदे, प्रदीप ढगे, वामन रंगवाळ, बळवंत कुलकर्णी, किसनराव सोनटक्के जळकोट,रामदास मलवाडे देवणी, नळगीर गुडसूर येथील नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास शहरा

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें