
उदगीर प्रतिनिधी, सगू हसन
उदगीर तालुक्यातील वाढवना (बू) येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत दिनांक 16जानेवारी 2026रोजी स्वंयशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी इयत्ता दहावीच्या मुलींना एका दिवसासाठी शिक्षक म्हणून काम करण्याची, संधी मिळाली असल्याने मुलींनी नियोजनपूर्वक, एक दिवस शाळा चालविली. यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते नववीच्या मुलींनी सहकार्य केले. या वेळी शाळेतील प्रमुख शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
एक दिवस शाळा चालवित असताना कशी तयारी करावी लागते, याची जाणीव झाली असल्याचे कबुल केले.
या एक दिवशीय शाळेत मुख्याध्यापक म्हणून आयशा मुंजेवार, उप मुख्याध्यापक, म्हणून गौरवी विभुते, सह शिक्षीका खेळगे सृष्टी ,यांनी काम पाहिले व सहकारी शिक्षीका म्हणून सगू तह सिम, मठपती श्रेया, सुहाना उंदरे, कासार समरी न, कासार अल्फिया, अमीना थोडगे, सुहाना कुरेशी, तेलंगे ऋतुजा, लक्ष्मी चव्हाण, मुंजेवार सुमैया, उस्किलवाड वैष्णवी, केसगीरे निकिता, वाघमारे निकिता, जाधव रक्षिता, जोहा आतार, पदाजी मुक्ता, चांदकणे लक्ष्मी, सानिया मुंजेवार, श्रावनी केसगीरे, गोमसाले निकिता, डांगे मारिया, रानी जाधव, आरती आष्टुरे, दुबूकवाड प्रतिज्ञा, जाधव आरती बाळू, जगताप नेहा.
या सर्व मुलींनी एक दिवसीय शाळा नियोजन पूर्वक, शिस्तीत उत्साहात चालउन एक यादगार स्कूलडे शालेय उपक्रम पार पाडत आपल्या गुरूंचे मन जिंकले. हा कार्यक्रम पाहता सर्व मुली शिक्षीका असल्याने ही शाळा वास्तवात कन्या शाळाअसल्याचे दृश्य दिसत होते.
हा कार्यक्रम इयत्ता दहावीच्या मुलीसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरला.
या स्वयं शासन दिनाच्या कार्यक्रमाचे, शाळेचे मुख्याध्यापक मद्देवाड विठ्ठल, सर, शेख मजहर सर, घोडके सर, बर्गे सर, सबा खान मॅडम, पांचाळ मॅडम, बिरादार सर, दुर्राणी सर , शेख मॅडम, देव शटवार सर, पठाण मॅडम, मंदाडे मॅडम, शेळके सर यांनी एक दिवशीय अध्यापनाचे निरीक्षण करून मार्गदर्शन केले.