उदगीर रोटरी क्लबच्या वतीने ‘बाळकृष्ण मुक्कावार ‘ यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उदगीर प्रतिनिधी (पी. के. पंदरगे): 23फेब्रुवारी 2026 रोजी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल च्या वतीने उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील ज्येष्ठ व्यापारी बाळकृष्ण मुक्कावार यांना ‘ जीवन गौरव ‘ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रोटरी क्लबचा 121 वा वर्धापन दिन ‘ रोटरी डे ‘ म्हणून साजरा करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्कार उदगीरचे भूमिपुत्र असलेले नांदेड येथील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोरोलाजी तज्ञ डॉ. नितीन जोशी, उदगीरचे भूमिपुत्र हैदराबाद येथील उद्योजक श्री मारोती मारलापल्ले, उदगीर येथील ज्येष्ठ व्यापारी श्री ईश्वरप्रसाद बाहेती, श्री शिवकुमार डोईजोडे, श्री दत्तात्रय भोसले या सर्वांना उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मोरया मंगल कार्यालय उदगीर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पुरस्काराचे वितरण रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3132 चे माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन बिपीन पाटील यांच्यासह रोटरी क्लब चे पदाधिकारी उपस्थित होते.

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें