उदगीर बसस्थानक पुर्नबांधणीच्या रखडलेल्या कामासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजूर माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांची माहिती*

उदगीर येथील बसस्थानकाची इमारत जुनी होती काही दिवसांपासून जीर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. छताची पडझड, अपुरी बसण्याची व्यवस्था, स्वच्छतेच्या समस्या आणि सुरक्षिततेबाबतची चिंता यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. ही गंभीर बाब लक्षात घेत तात्काळ बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या बाबतीत शासनाने दखल घेऊन निधी ही दिला व अत्याधुनिक बसस्थानकाचे काम सुरु झाले मात्र मंजूर असलेला निधी अपुरा पडत होता त्यामुळे बरेच दिवस काम बंद पडले होते, ही बाब माननीय आमदार संजय बनसोडे साहेबाच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा निधी वाढून मिळावा यासाठी ते प्रयत्नशील होते. या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी मिळाली असून, उदगीर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल ३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाची विविध वृत्तपत्रे व माध्यमांनी दखल घेत स्वागत केले असून, प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात केले आहे.नवीन बसस्थानक सुसज्ज, सुरक्षित आणि सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे उभारले जात आहे. प्रशस्त प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तिकीट खिडक्या, दिव्यांगांसाठी सुविधा तसेच योग्य प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छता यांचा समावेश करण्यात येणार आहे. लवकरच उर्वरीत बांधकामास सुरुवात होऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.या पुनर्बांधणीमुळे उदगीर शहराच्या वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार असून प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहे. हा निर्णय उदगीरच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. असे मत माननीय आमदार संजय बनसोडे साहेबांनी व्यक्त केले.

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें