वाढवना, येथील दहावी बोर्डाची परीक्षा सुरळीत…

वाढवना (बू) प्रतिनिधी. सगू हसन.उदगीर तालुक्यातील वाढवना (बू) येथील जिल्हा परिषद प्रशाला माध्यमिक शाळेत दिनांक 20फेब्रुवारी 2026पासून इयत्ता दहावी, बोर्डाची परीक्षा चालू असून या परीक्षेत एकूण 230परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षेत परीक्षार्थींनी, कॉपी करु नयेत म्हणून परीक्षा खोलीमध्ये सी. सी. टी. वी कॅमेरे लावण्यात आले आहेत. व पूर्ण पेपर होईपर्यंत परीक्षा सेंटरवर बैठेपथक ठाण मांडून आहेत. व परीक्षे, बाहेर पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त करीत आहेत. त्या मुळे या परीक्षा सेंटरवर मुले शांत वातावरणात परीक्षा देत आहेत. त्या मुळे या सेंटरवरील परीक्षा सुरळीत व व्यवस्थित चालू आहे. परीक्षा चालू असताना शिक्षण विभागाकडून, नियुक्त केलेले पथक, अधिकारी अचानक भेट देत आहेत.दिनांक 20फेब्रुवारी 2026ते 27फेब्रुवारी 2026पर्यंत एकूण चार पेपर झाले असुन या परीक्षे दरम्यान कसल्याही प्रकारचा, अनुचित प्रकार घडला नाही. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी, परीक्षा केंद्र संचालक दायमी सलीम परिश्रम घेत आहेत.

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें