वाढवणा बु येथील हजारो मुस्लिम बांधवानी ईद उत्साहात साजरी केली…

उदगीर हसन सगु दि. 22/03/2026

उदगीर तालुक्यातील वाढवणा बु येथील मुस्लिम बांधवानी सामूहिक इदुलफित्रची नमाज दर वर्षा प्रमाणे यंदाही 15 मार्च शनिवार रोजी ईदगाह मैदानावर उत्साहात अदा केली. सकाळी नऊ वाजेपासून गावातील सर्व मुस्लिम बांधव आपआपल्या पाल्य इष्ट मित्रा सोबत ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते सकाळी साडे दहा वाजता मौलाना मुफ्तीसाब यांनी इदुल फित्रची नमाज पठण केली हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र जमले होते नमाज पठण झाल्यानंतर खुदबा पठण करून लगेच मुफ्ती साहेबांनी हजारोच्या जनसमुदायाच्या समक्ष सर्व मनुष्य जातीसाठी एकता अखंडता भाईचारा देशप्रेम एकनिष्ठताराहावी सर्व जातीधर्मातील लोकांनी गुण्यागोविंदाणे राहावेत अशी दुवा अल्लाह समोर मागितली हजारोच्या जनसमुदायाने मुफ्ती साहेबांच्या दुआला प्रतिसाद देत आमीनअल्लाह म्हणत सर्वांना चांगली बुद्धी दे एकमेकांची मदत सहकार्य करण्याची इच्छा शक्ती दे म्हणुन अल्लाह कडे दुआ रूपाने साकडे घातले यावेळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवाना ईदची मुबारक बाद देण्या करिता दैनिक सामनाचे वार्ताहर हुकूमत शेख,हसन सगु आदि मुस्लिम बांधव तसेच अनेक हिंदू बांधव ईदगाह मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी आले होते सर्व मुस्लिम बांधवाना मुबारक बाद देत एकमेकांनी मिठी मारत गळाभेट घेतली भाई चारा व सर्वधर्म समभाव एकतेची मिसाल कायम ठेवत ईद उत्साहात साजरी करण्यात आली..

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें