महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक तथा औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावातील सर्वसामान्य कुटुंबात आई त्रिवेणी व वडील श्री बाबुराव जगताप या दाम्पत्याच्या पोटी 1 जून 1947 रोजी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्या बालकांचे नाव सुरेश असे ठेवण्यात आले. लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता होती.
“बाळाचे पाय पाळण्यात दिसतात”.
या उक्तीप्रमाणे आई- वडिलांच्या आशीर्वादाने गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करून कार्यकर्तुत्वांचा ठसा उमटवत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेत सहशिक्षक म्हणून रुजू झाले काही काळ शिक्षकांची नोकरी केली आणि तिथून पुढे सुरेशरावांनी मागे वळून कधीच पाहिले नाही.
“अडथळे ही अडवणूक नसते तर ती एक असते संधी”.
जीवनात आलेल्या अशा अनेक अडथळ्यांशी संकटांशी दुर्दम्य इच्छाशक्तीने त्यावर सहजपणे मात केली.
सुख में उछलूंगा नही,
दुःख मे फिसलूंगा नही l
असा ठाम निश्चय करून दुर्दम्य उत्साह जराही कमी होऊ न देता भव्य दिव्य स्वप्न पाहिले पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर ती स्वप्न साकार केली.

शिक्षा सबसे शक्तिशाली हाथीयार हैl
कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कमालीची निर्णय क्षमता वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व अशा गुणांनी संपन्न असलेल्या व्यक्तिमत्त्वांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि स्वप्नांचा पाठलाग करत ध्येयवेड्या आदरणीय सुरेशरावजी जगताप या अवलीयांनी पुढे शिक्षणाधिकारी एस.एस.सी .बोर्डाचे पुणे विभागीय अध्यक्ष
शिक्षण सहसंचालक महाराष्ट्र राज्य
अशा शिक्षणाक्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर विराजमान झाले आणि महाराष्ट्रातील एक कडक शिस्तीचे ,कार्यक्षम आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपला आगळावेगळा ठसा उमटवला. नेहमी नवोपक्रमशीलतेला आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले.
आपल्या महत्त्वाकांक्षी दूरदृष्टीने महाराष्ट्राच्या शैक्षणिक ध्येय धोरणात अमुलाग्र बदल घडविण्यात मोलाचे योगदान दिले म्हणूनच म्हणतात ना
” वारसा असो वा नसो कर्तुत्व सिद्ध करावे लागते.”
याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय सुरेशरावजी जगताप साहेब.
" Nothing is impossible in the world."
या उक्तीप्रमाणे अशक्य हा शब्दच पुसून टाकला सामर्थ्याची कल्पना मनात बाळगण्यापेक्षा कल्पनांचे सामर्थ्य खरं करून दाखवलं. पुणे शहराच्या पूर्व भागातील खराडी सारख्या ओसाड व माळरानावर असलेल्या वंचित पीडित घटकातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचे अंधारमय भविष्य ज्ञानाने प्रकाशमय करण्यासाठी काळाची पाऊले ओळखून काही विश्वासू शिलेदारांना सोबत घेऊन या शिक्षण योध्याने 26 फेब्रुवारी 1992 साली सारथी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.
“उद्धरेदात्मनात्मानम” संस्थेच्या या ब्रीद प्रमाणे स्वतःची जडणघडण स्वतःचा उद्धार स्वतः करत असतानाच इतरांच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोलाची कामगिरी पवित्र अशा शिक्षणकार्यात -क्षेत्रात आदरणीय साहेबांच्या हातून घडली. शिक्षक -कर्मचाऱ्यांनी नेहमी मनाने आणि शरीराने सुदृढ राहावे यासाठी आर्ट ऑफ लिविंग सारखे मेडिटेशनचे कोर्स संस्थेत राबवत असत. सर्व शिक्षक- कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासाकडे सुद्धा बारकाईने लक्ष होते . शिक्षकांच्या संसाराचे मळे फुलविण्याचे अत्यंत प्रेरणादायी असे कार्य केले. विद्यार्थी असो वा शिक्षक असो त्यांच्यातील चांगल्या गुणांची- कार्यांची दखल घेत सदैव कौतुकाची थाप पाठीवर देत असे.
काम करते रहो
कमिटेड रहो
बाकी सब होता है l
लोकांना हाताळण्याचे त्यांच्यात अपूर्व कौशल्य होतं. जणू ते चालते बोलते विद्यापीठच विविध क्षेत्रातील लोकांना तसेच विविध एनजीओ ला सोबत घेऊन समाज प्रबोधन तथा शैक्षणिक व सामाजिक चळवळीत सामील करून आपले कार्य अखंड ठेवले ते शेवटच्या श्वासापर्यंत. भगवदगीतेत सांगितल्याप्रमाणे महान व्यक्तीची कृती इतरांसाठी स्फूर्तीदायक असते अशी व्यक्ती जे काही करते ते इतरांना अनुसरण्यासाठी मापदंड बनतो साक्षात ते साहेबांनी साध्य केलं.
कर्तबगारीची उत्तुंग भरारी सर्वांसाठी प्रेरणादायी अशीच आहे ज्या शिक्षण संस्थेत शिक्षक पदावर रुजू झाले त्याच संस्थेचे पुढे संचालक सुद्धा झाले आमचा आत्मविश्वास टिकून आहे आशा पल्लवीत आहेत परिपूर्णतेचा ध्यास असणारे अभ्यासू प्रेरणादायी आत्मविश्वासू वक्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व आदरणीय सुरेश रावजी जगताप साहेब आप ही है प्रेरणा l
आदरणीय सुरेशराव आणि इंदुमतीबाई (मम्मी) यांनी
व्यक्तिगत जीवनात नेहमीच साधी राहणी पसंत केली आणि विचारपूर्वक निवडलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी उदारपणे व अविरतपणे कार्य करून अनेकांना मदतीचा हात दिला.
आदरणीय स्व.सुरेश रावजी जगताप साहेबांच्या स्मृतींना आदरांजलीचा एक मात्र मार्ग त्यांच्या जीवनातून त्यांनी पाहिलेल्या स्वप्नामधून आणि जपलेल्या नीतीमूल्यातून शिकत राहणं गोरगरीब वंचित पीडित शोषित घटकातील होतकरूंचा सर्वांगीण विकास करत त्यांच्या स्वप्नांना बळ देऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहणं हीच खरी आदरांजली ठरेल.
1 जून 1947 ते 15 मार्च 2025 या
78 वर्षाच्या जीवनकालात स्वावलंबन परिश्रम दूरदृष्टीकोन सहकार्यवृत्ती वक्तशीरपणा शिस्तप्रिय कमालीची निर्णयक्षमता असामान्य नेतृत्व गुणांचे दर्शन घडवलं . स्वप्नांचा पाठलाग करून स्वप्नपूर्ती करणाऱ्या ध्येयवादी सारथी परिवारांचा आधारवड शिक्षणमहर्षी स्व.सुरेशरावजी जगताप साहेब आपल्या कार्याची आणि आदर्शाची आठवण कायमच आम्हास नव्या ऊर्जेने प्रेरित राहील.
साहेब …
कृतज्ञतापूर्वक आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
शब्दांकन
श्री .अशोक गोविंदराव देवकते
HSC Ded DMCJ
उपशिक्षक-- नूतन माध्यमिक विद्यालय केशवनगर
संपर्क-7083543013
🎯🎯🎯🎯