समर्थ विद्यालय एकूर्का रोड येथे शालेय स्पर्धा….

उदगीर प्रतिनीधी, सगु हसन.

प्रजासत्ताक दिना निमित्त सध्या प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खेळ खेळण्याची सुवर्ण संधी शाळेकडून निर्माण करुन दिली जात आहे. या संधीचे सोने करीत विद्यार्थीही आपल्या शाळेच्या घरच्या मैदानावर आपले खेळाचे कौशल्य दाखवित आपण ही खेळाडू आहोत हे सिद्ध करून दाखवत असल्याचे चित्र समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एकूर्का रोड, तालुका उदगीर येथील शालेय मैदानावर दिनांक 23जानेवारी 2026रोजी पाहण्यास मिळाले. या शाळेत प्रत्येक विद्यार्थी खेळला पाहिजे या साठी शाळेकडून सांघिक स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा, चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 23जानेवारी 2026रोजी शालेय मैदानावर क्रिकेट, व्हॉलीबॉल चे सामने घेतले गेले या वेळी खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत प्रेक्षकांचे, शिक्षकांचे मन जिंकले. खेळाडूंचे खेळ पाहून विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांची साथ दिली. सामना जिंकणाऱ्या संघास शाळेकडून प्रोत्साहन पर बक्षीस देऊन पाठीवर शाबासकीची थाप देऊन कौतुक, व अभिनंदन केले. या शालेय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य प्रमोद चौधरी सर यांच्या मार्गदर्शना खाली प्रा. एम. एम. स्वामी सर, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके सर, किरण हाळी घोंगडे सर, तेलंगे सर, रसूल पठाण सर, इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या वेळी आवर्जून उपस्थित, झालेले पटेल सर यांच्या हस्ते खेळाडूंना शाळेच्या वतीने व त्यांच्या वतीने प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. क्रिकेट सामन्याचे पंच म्हणून सिद्धार्थ बोडके यांनी व व्हॉलीबॉल सामन्याचे पंच म्हणून शादूल, खान यांनी काम पाहिले.

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें