नूतन मराठी विद्यालय, अहमदपूर येथे हळदी कुंकू व नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार…..

उदगीर प्रतिनिधी: नूतन मराठी विद्यालय, अहमदपूर येथे हळदी कुंकू व नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार करुन पालक मेळावा कार्यक्रम 22/012026 रोजी आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्षा लोकायत चॅरिटेबल ट्रस्ट च्या विश्वस्त मा. अनिताताई आबासाहेब देशमुख व विशेष उपस्थिती म्हणून मा. रुपालीताई स्वप्नील व्हते होते. प्रमुख पाहुणे पोलिस उपनिरीक्षक अहमदपूर मा. सौ. स्मिता जाधव मॅडम, माजी नगराध्यक्ष सौ. अश्विनीताई कसनाळे ,गटनेत्या मीनाक्षीताई शिंगाडे , मा उषाताई देवकत्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुधवंत ए. के यांनी केले. या कार्यक्रमास सहकार्य सौ. होळंबे डी. यू व नूतन मराठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व स्टाफ यांनी केले . कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला पालक उपस्थित होत्या.

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें