नूतन मराठी माध्यमिक विद्यालय, अहमदपूर शाळेत स्वयंशासन दिन व बक्षीस वितरण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न 💐

उदगीर प्रतिनिधी: अहमदपूर येथील नूतन मराठी माध्यमिक विद्यालयात दि. 09/02/2026 रोजी 26 जानेवारी निमित्त घेतलेल्या क्रिडा स्पर्धाचे बक्षीस वितरण व स्वयंशासन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षिका सौ. बुधवंत ए. के. यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक मा. श्री शिंदे एस. ए. प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित श्री शेंडगे एन. पी. व श्री गुडदे एस. एल., श्री पुणेवाड पी. एन. हे उपस्थित होते. या दिवशी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना एक दिवसासाठी शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याने विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक एक दिवस अत्यंत उत्साहात शाळा चालविली. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहिला मिळाले. यावेळी इयत्ता 1ली ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले. यावेळी शाळेतील प्रमुख शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी एक शिक्षक बनून वर्गात जाताना शिक्षकांना किती तयार करावी लागते याची जाणीव झाल्याची कबुली दिली. क्रीडास्पर्धा बक्षीस समारंभ ही उत्साहात पार पडला. क्रीडा प्रमुख श्री सोमवंशी एस. के. सरांनी कार्यक्रमांचे आभार मानले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें