उदगीर (प्रतिनिधी) : माती वाचवा आणि आरोग्याचा संदेश देत, उदगीर येथील सायकल स्वारानी उदगीर ते गुजरातमधील सोमनाथ मंदिर आणि द्वारका हे 1500 कि.मी. अंतर सायकलने पार करत सामाजिक जन जागृतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी जीवनशैली या उद्देशाने गेल्या अनेक वर्षापासून उदगीर सायकलिंग क्लब कार्यरत आहे.
सुनील ममदापूरे व साईनाथ कोरे यांच्या नेतृत्वाखाली 2002 सालापासून प्रत्येकवर्षी उदगीर ते तिरुपती ही सायकलिंग रॅली सुरू करण्यात आली. मागील नऊ वर्षांपासून उदगीर सायकलिंग क्लब ईशा फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन कार्य करत आहे. त्यांचा मुख्य उद्देश विविध राज्यामध्ये जाऊन लोकांपर्यंत पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे आहे. या वर्षी क्लब ने महाराष्ट्र सीमा ओलांडून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या सोमनाथ मंदीर व द्वारकानगरी पर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.
उदगीर सायकलिंग क्लब मध्ये सहभागी सुनील ममदापूरे, साईनाथ कोरे, गोविंद रंगवाळ, बालाजी इंद्राळे, नागनाथ वारद, अतुल वाघमारे, जगदीश पंडित, मुकेश निरुणे, ज्ञानेश्वर चंदेगावे, महेश आलमखेरे, कपिल वट्टमवार , अश्विन पांढरे, भास्कर कुंडगीर, मुकुंद चव्हाण, रामेश्वर तोंडारे, अजित पाटील, सतीशकुमार चवळे, महेंद्र मादलापुरे, प्रेमनाथ मोदी, ओमकार बिरादार, रमाकांत वडजे, प्रमोद बुटले, सूर्यकांत आंबेसंगे, सचिन शेंद्रे, सतीश बिरादार, सचिन पेंडलवार, हरिप्रसाद दंडिमे, रामेश्वर सोनी, अनिरुद्ध जोशी हुमनाबादकर, तसेच सहकारी म्हणून गणेश गुंडरे, कृष्णा मुंडे, विठ्ठल येणकुरेकर, तात्याराव गायकवाड, गोपाळ रोकडे सहभागी झाले होते. या सायकल वीरांनी उदगीर ते गुजरातमधील द्वारका हे 1500 कि. मी. अंतर 11 दिवसांत सायकल ने पार करत माती वाचवा हा संदेश देत सामाजिक जनजागृतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
