श्री. महालक्ष्मी माता चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर संचलित,सदानंद ग्लोबल प्री प्रायमरी स्कूल, जिंतूर चा पहिला वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा..

जिंतूर प्रतिनिधी ( श्री. प्रसाद देशमुख) :-

दि. 31 जानेवारी 2026 रोजी श्री महालक्ष्मी माता चॅरिटेबल ट्रस्ट लातूर संचलित सदानंद ग्लोबल प्री प्रायमरी स्कूल चा पहिला वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दुपारी एक वाजता चालू झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेश्वर रघुनाथराव पतंगे हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नरवडे साहेब ,श्री. पवन दत्तात्रेय साठे , श्री हनुमान रनेर सर, श्री पंढरीनाथ शिंदे साहेब, श्री. गोपाळराव देशमुख, श्री. विकास तपसे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रणेर सर यांनी केले. तसेच सदरील कार्यक्रमाचे आयोजन सदानंद ग्लोबल प्री प्रायमरी स्कूलचे संचालक श्री. प्रसादराव देशमुख साहेब, चि. यशराज देशमुख, प्राचार्य सौ. मीना जाधव मॅडम, प्राध्यापक श्री. सिद्धार्थ इंगळे सर आणि सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय चांगल्या स्वरूपाचे केले होते. शाळेच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी नृत्य प्रदर्शन, गाणे अशा अनेक कलाकृती अतिशय सुंदर रित्या सादर केल्या. तसेच स्नेहसंमेलनाला पालकांचा अतिशय उस्फूर्त प्रतिसाद मिळाला..

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें