सगु हसन उदगीर प्रतिनिधीदि.3 वाढवणा (बु.)
जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात स्थानिक आणि बाहेरील अशी स्पर्धा दिसून येत आहे. भाजपा व काँग्रेसने स्थानिकांना न विचारताच उमेदवारी दिल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात नाराजी दिसत असून, कार्यकर्त्यांची नाराजी कुणाला भोवणार, हे काळच ठरविणार आहे.उदगीर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचे तसेच स्थानिक ठिकाणी ७००० मतदानाचे गाव असून संघात २५००० मतदार तर पंचायतसमितीसाठी १२००० मतदार आहेत. उदगीर जळकोट तालुक्याचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत. वाढवणा बु. हे आमदाराच्या मतदारसंघात असून जिल्हा परिषद वाढवणा बु. गट गण आहे. आमदारांनी गावातील इच्छुक सर्वच उमेदवारांना फॉर्म भरण्यास लावले, मात्र शेवटच्या दिवशी अचानक भाजप-राष्ट्रवादी महायुती करून मतदारसंघाबाहेरील उमेदवार दिला. भाजपचाकाँग्रेस पक्षाने देखील गावातीलऐनवेळी निष्ठावंतांना डावललेव मतदारसंघातील सामान्य मतदारांना विश्वासात न घेताच मतदारसंघातील हाळी येथील उमेदवाराला जिल्हा परिषद गटातून काँग्रेसची उमेदवारी दिली. दोन्ही पक्षांनी स्थानिक सामान्य मतदारांना विश्वासात न घेताच उमेदवारी जाहीर केली. जिल्हा परिषद गटातून गावातील उच्चाशिक्षित बेलफूल विकणारा अमोल फुलारी वाढवणा जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तर दोन महिला उमेदवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याअसून उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. भाजपा व काँग्रेस ने स्थानिकांना न विचारताच उमेदवारी दिल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात नाराजी दिसत असून कार्यकर्त्यांची नाराजी कुणाला भोवणार हे काळच ठरवेल. दरम्यान, सामान्यांचा कल अपक्षकडेच दिसत आहे. जिल्हा परिषद गटातून ४ उमेदवार तर पंचायत समिती गणातून चार, वाढवणा बु. मधून दोन महिला उमेदवार तर एकाच गावातील वाढवणा खुर्द येथील दोन महिला नशीब आजमावत आहेत.
