वाढवणा बु जि.प.प्रशाला मुले राज्याबाहेर( ‌केरळ)अभ्यास भेटीसाठी निवड…

लातूर : समग्र शिक्षा, जिल्हा परिषद लातूर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अविष्कार अभियान कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तर नियोजनातून जिल्हा परिषद प्रशाला ( मुले) वाढवणा बु. येथील विद्यार्थी अमन अली इस्माईल अली धावडे याची राज्याबाहेरील (केरळ) अभ्यास भेटीसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती व नाविन्यपूर्ण विचारांची जडणघडण व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून राज्याबाहेरील शैक्षणिक व अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
अमन अली इस्माईल धावडे याची जिल्हास्तरावर निवड झाल्याने शाळेचा व गावाचा गौरव वाढला आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री दायमी सर, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री इस्माईलअली अब्बासअली धावडे उप अध्यक्ष शिंदे केशव शिक्षक आवळे सर,मोमिनगिरे मॅडम,बिराजदार मॅडम,मोमीन सर,सोमासे मॅडम,सावंत मॅडम,सोमुसे मॅडम, मधाळे सर, दैठणकर आशिष सर ,
शिक्षणतज्ञ पदाजी सर, दैनिक सामनाचे पत्रकार हुकूमत शेख , दैनिक बालाघाट चे संपादक प्रमोद बिरादार, महाराष्ट्र चॅनल चे उप संपादक यादुल डांगे, भीमा कोरेगाव साप्ताहिक पेपरचे उपसंपादक सगु हसन , प्रा. राहुल रामपूरकर सर यां सर्वांनी अमन अली इस्माईल अली धावडे याचा अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ही निवड विद्यार्थ्याची कष्ट, जिज्ञासा व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे गावातील ग्रामस्थांनी व शिक्षण प्रेमींनी असे मत व्यक्त केले.

maymarathi24news
Author: maymarathi24news

MSW DOCTORATE IN SOCIAL WORK

Leave a Comment

शहर चुनें