उदगीर प्रतिनिधी हसन सगु दि. 13
वाढवणा (बु.): वाढवणा बुयेथील रहिवाशी जुनेद तैमूर शेख या भूमिपुत्राची नवी मुबंई येथे महाराष्ट्र व्हालीबॉल लीग मध्ये अंबा टायगर या संघात बोली लावुन संघात घेण्यातआल्या मुळे जुनेद तैमूर शेख याचे वाढवणा पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. ११ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे महाराषट्र व्हालीबॉल लीग स्पर्धेत खेळण्यासाठी नागपूर ऑरेंज सिटी, कोल्हापूर रॉयल्स, अंबा टायगर अनेक जणांनी जुनेद तैमूर शेख ची बोली लावली सर्वात जास्त २० हजार रुपयांची बोली अंबा टायगर संघाने लावुन जुनेद शेख ला संघात घेऊन लीग मध्ये खेळण्यासाठी निवड झाल्यामुळे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शाल श्रीफळ फटाके वाजवून सत्कार केला या वेळी सलीम तोंडारे,जुबेर जानिमियाँ शेख, फेरोज पठाण, फरदिन शेख, आमीनआली धावडे, रामदास उजनकर, गणेश हळणे, अल्बक्ष शेख, दस्तगीर कोठीवाले, अजीम डांगे,अलीम तोंडारे, दैनिक सामना दै.शुभदिन चे पत्रकार हुकूमत शेख, दै. देशोन्नतीचे पत्रकार माधव मिरजगावे, हसन सगु, आदिंनी सत्कार केला. व्हाट्सअप ग्रुपवरून देखील अभिनंदन होत आहे.
